Total Pageviews

Sunday 22 January 2023

Do not mistake सगळ्याच गोष्टींना सोने समजू नये.

 पिवळ्या रंगाच्या सगळ्याच गोष्टींना सोने समजू नये.

किती आंधळे एकत्र आले म्हणजे एक डोळस समजायचा?लाखो आंधळे=एक डोळस असं कोणतंही सूत्र नाही.

पूर्वी स्वतःला सिद्ध केल्यावर प्रसिद्धी मिळायची.हल्ली  प्रसिद्ध होण्यासाठी स्वतःला सिद्धच करावं लागतं असं काहीही नाही.

एकमेकांवर चिखलफेक करून आपापल्या कंपूत मीच किती शहाणा हे दोन्ही बाजूच्या इतर मूर्खांना पद्धतशीरपणे पटवून देण्यासाठी काही अपवाद वगळता सर्वच जण प्रसिद्धी माध्यमांना अक्षरशः खरेदी करतात व या लिलावात पुन्हा पुन्हा स्वतः ला विकून घेण्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ पुरुषार्थ समजतो आहे.

साक्षर अज्ञानी व सुशिक्षित बेकरांची अब्जावधी टाळकी या सगळ्यांना सोशल मीडियावर अत्यल्प दरात चोवीस तास उपलब्ध आहेत.

धर्म,जात,विज्ञान,इतिहास,समाजकारण, राजकारण सगळ्यांचीच चौकट इतकी खिळखिळी झाली आहे की या चौकटीचे निष्ठावान घट्ट खिळेही ढिल्या खिळ्यांना काहीच करू शकत नाहीत .किंबहुना ते घट्ट खिळेही  ढिल्ल्या खिळ्यांच्या नियंत्रणात आहेत की काय असे न राहवून वाटते.



Do not mistake everything yellow for gold. How many blind people come together to mean one eye? There is no such formula as one million blind people = one eye. Earlier you got fame by proving yourself.Nowadays you don't have to prove yourself to be famous.

Everyone, with few exceptions, literally buys the media to systematically convince other idiots on both sides that they are wiser than others by throwing mud at each other and selling themselves again and again in this auction is seen as the fourth pillar of democracy. Billions of literate ignorant and well-educated unemployed

are available round the clock on social media at very low rates.

The framework of religion, caste, science, history, sociology, politics has become so nailed that even the loyal tight nails of this framework cannot do anything to the loose nails.

.in fact even those tight nails seem to be in control of loose nails.